चीनचा २०२२ मध्ये साखरेचा खप ९ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर

न्यूयार्क : भारतानंतर जगातील द्वितीय क्रमांकाचा, सर्वात मोठा साखरेचा वापरकर्ता देश असलेल्या चीनमध्ये २०२२ मध्ये साखरेचा खप गेल्या नऊ वर्षांतील सर्वात निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे, असे Czarnikow च्या अहवालात म्हटले आहे.

COVID-१९ आणि आर्थिक विकासाची गती संथ झाल्याने साखरेच्या खपावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याबाबत Czarnikow ने म्हटले आहे की, चीनमध्ये यावर्षी साखरेचा खप १५ मिलियन टनापेक्षा कमी असेल. कारण, कोरोना व्हायरसच्या फैलावानंतर मोठ्या शहरांतील लोकांच्या ये-जा करण्यावरील कडक निर्बंध घातले गेले. याचा परिणाम कँडी, केक आणि शीतपेयांच्या विक्रीवर झाला आहे.

चीनमध्ये यापूर्वी २०१३ मध्ये साखरेचा १५ मिलियन टनापेक्षा कमी वापर झाला होता. अहवालात म्हटले आहे की, साखर उत्पादन आणि आयात संयुक्त रुपात २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये २.१ मिलियन टनाने घसरण्याची शक्यता आहे. स्थानिक उत्पादकांकडे साखर साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, कारण विक्रीत घसरण झाली आहे. कमकुवत मागणीमुळे शुगर रिफायनरींकडून कच्च्या साखरेची आयात २०१९ नंतर प्रथमच सर्वात निच्चांकी स्तरावर गेली आहे. आणि २०२२ मध्ये ही आयात ४.४७ मिलियन टन होईल असे अनुमान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here