शांघाइ(चीन) : चीनच्या कृषी मंत्रालयाने सांगितले आहे की, यंदा लष्करी आळी पासून होणारा धोका अधिक गंभीर झाला आहे. या विनाशकारी किडीचा परिणाम यावर्षी सुमारे 100 दशलक्ष एमयू (6.67 दशलक्ष हेक्टर) लागवडीवर होईल. तसेच ऊस , ज्वारी आणि हिवाळी मोसमातील गव्हाच्या पीकावर होण्याची शक्यता शुक्रवारी कृषी मंत्रालयाने वर्तवली आहे.
एका सरकारी संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये चीनमधील दशलक्ष हेक्टर जमीनीवर लष्करी आळीचा प्रादुर्भावर प्रथमच झाला आहे. या किडीमुळे प्रामुख्याने गहू आणि ऊस पिकाचे नुकसान होते.
गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून चीनच्या नैऋत्य सिचुआन प्रांतात कमीतकमी 170 हेक्टर गहू पिकाचे नुकसान या लष्करी किडीमुळे झाले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.