कोविडमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे चीनने आर्थिक विकास दराच्या उद्दिष्टात कपात केल्याचे दिसून येत आहे. एका सरकारी अहवालानुसार, नॅशनल पीप्युल्स काँग्रेसने आपले वार्षिक संसदीय सत्र रद्द केले आहे. यावर्षी निश्चित केलेले उद्दिष्ट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. याबाबत सुत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, यंदा आर्थिक विकास दर ६ टक्क्यांपर्यंतच निश्चित केला जावू शकतो. सध्याचे प्रीमियर ली केकियांग यांनी सांगितले की, आर्थिक स्थिरतेला प्राधान्य दिले पाहिजे. यावर्षी जवळपास १२ मिलियन शहरी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या, ११ मिलियनपेक्षा हे उद्दिष्ट अधिक आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या जीडीपीमध्ये गेल्यावर्षी फक्त ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका दशकात आर्थिक आघाडीवर चीनची गेल्या चार दशकातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. चीन सरकारने कोविडबाबत कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे आर्थिक हालचालींना मोठा फटका बसला. अहवालानुसार ली यांनी सरकारी बजेटच्या तुटीचे उद्दिष्ट जीडीपीच्या ३ टक्के निश्चित केले आहे. गेल्यावर्षीच्या २.८ टक्के उद्दिष्टापेक्षा हे अधिक आहे. यावर्षी संसदीय सत्रामध्ये सरकार फेरबदल लागू करण्याच्या निर्णयाची घोषणा करू शकते, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक आघाडीवर चीन अद्यापही अडचणींना सामोरा जात आहे. कोविडमुळे प्रभावीत झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. ली हे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी एकनिष्ठ मानले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे जगातील द्वितीय क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. पीपुल्स काँग्रेसने रविवारी म्हटले आहे की, पक्षाच्या केंद्रीय समितीच्या मजबूत नेतृत्वामुळे कठीण आव्हानांवर नियंत्रण मिळविल्यानंतर आम्ही आर्थिक कामगिरी चांगली राखण्यात यशस्वी झालो आहोत.