कोविडच्या नव्या व्हेरियंटने चीनची स्थिती खराब

नवी दिल्ली : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. कोरोनामुळे तेथील हॉस्पिटल पुन्हा रुग्णांनी भरू लागली आहे. कोरोनाची ही लाट ओमिक्रॉनच्या BF.७ व्हेरियंटमुळे आली आहे. चीनमधील हा कोरोनाचा नवा प्रकार भारतातही पोहोचला आहे. गुजरामधील दोघे तर ओडिशातील एकजण BF.७ चा रुग्ण आहे. त्यामुळे लोकांनी या व्हेरियंटची धास्ती घेतली आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, Corona चा BF.७ वेरियंट अनेक देशांमध्ये खतरनाक म्हटला गेला आहे. कोणताही व्हायरस म्युटेड असतो, तेव्हा तो आपला व्हेरियंट व सब व्हेरियंट तयार करतो. अशाच पद्धतीने SARS-CoV-2 व्हायरस कोरोनाचे मुख्य केंद्र असून तो वेगवेगळे व्हेरियंट आणि सब व्हेरियंट बनवतो. BF.7 सुद्धा अशाच प्रकारे ओम्रिकॉनचा सब व्हेरियंट आहे. सेल होस्ट अँड माइक्रोब जर्नलमध्ये प्रकाशित एका लेखानुसार, बीएफ ७ सब व्हेरियंटमधील मुख्य व्हेरियंटच्या तुलनेत ४.४ टक्के जादा न्युट्रलायझेशन रेजिस्टंट आहेत. त्यामुळे लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीज बीएफ ७ ला नष्ट करण्यास सक्षम आहेत. भारतातील बीएफ ७ व्हेरियंटचा प्रवेश झाला आहे. मात्र, तो जादा धोकादायक नाही असे सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here