बिजिंग : चीनी मंडी
मंगखुट वादळाच्या तडाख्यात चीनमधील ऊस शेतीची फारसे नुकसान झाले नाही. या वादळाचा मोठा तडाखा उसाला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. वादळाचा तडाखा ऊस पिकाला बसण्याच्या शक्यतेने सोमवारी साखर उत्पादक, पुरवठादार चिंतेत होते. मात्र, सुदैवाने तसे झाले नसल्यामुळे साखर उत्पादनावर याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या संदर्भात गुंगशी प्रांताची राजधानी नान्निंग येथील हौताई फ्युचर्सचे विश्लेषक वांग वेंडोंग म्हणाले, ‘वादळाचा जसा अंदाज लावण्यात आला होता. तसा त्याचा परिणाम झाला नाही. गुनंडोंग प्रांतातील सर्वाधिक ऊस उत्पादक भाग असलेल्या झॅनजिंग भागात वादळ पोहोचलेच नाही आणि नान्निंग भागातील पिकावरही त्याचा परिणाम झाला नाही.’ सुदैवाने वादळानंतर पाऊस झालाच तर तो ऊस पिकासाठी फायदेशीरच ठरेल, असे वेंडोंग यांनी सांगितले.
रविवारी गुनंडोंग परिसराला मंगखुट वादळाने धडक दिली. या वादळामुळे हाँगकाँग आणि मकाऊमध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात या वादळाने उत्तर फिलिपिन्समध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यात ५४ जणांचा बळी गेला आहे.
मुळात गुनंडोंग प्रांतात दरवर्षी दहा लाख टन साखरेचे उत्पादन होते. तर गुनंशीमध्ये जवळपास ६० टन साखरेचे उत्पादन होते.
गुनंडोंग येथील एका मोठ्या साखर कारखान्याचे व्यवस्थापक म्हणून काम करणारे लिन यांच्या म्हणण्यानुसार, ज्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होते. त्या भागाला वादळाचा तडाखा बसलाच नाही. याचा परिणाम अतिशय मर्यादित होता. काही भागात ऊस आडवा झाला असला, तरी तो साखर कारखान्यांसाठीच्या वापराचा नव्हता.
वादळाने दणका न दिल्यामुळे बाजारपेठेत थोडी शांतता आहे. तरी वादळाचे पुढचे परिणाम अजूनही जाणवलेले दिसत नाहीत. काल (सोमवार, १७ सप्टेंबर) उसाची बाजारपेठ पूर्णपणे थंडावली होती. पण, गेल्या आठवड्यात शुक्रवारी वादळाच्या भीतीने जुलैनंतर एका दिवसातील सर्वाधिक नफा पहायला मिळाला.