‘को-जन इंडिया’कडून साखर उद्योगातील देशातील सर्वात मोठे मीडिया आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म म्हणून ‘चीनीमंडी’ला पुरस्कार

पुणे : ‘राष्ट्रीय को-जनरेशन अवॉर्ड्स-2023’ सोहळ्यात को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने साखर उद्योगासाठीचा देशातील सर्वात मोठा मीडिया आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पुरस्कार ‘चीनीमंडी’ला देऊन गौरविण्यात आले. साखर उद्योगासाठीचे समर्पण आणि उद्योगाच्या प्रगतीत देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन ‘चीनीमंडी’चा सन्मान करण्यात आला. पुणे येथील टिप टॉप इंटरनॅशनल येथे आयोजित कार्यक्रमात ‘को-जन इंडिया’चे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते ‘चीनीमंडी’चे सीईओ आणि सहसंस्थापक उप्पल शाह आणि ‘चीनीमंडी’चे एमडी हेमंत शहा यांनी पुरस्कार स्वीकारला.

यावेळी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार, नॅशनल शुगर इंस्टिट्यूट, कानपूर (NSI) चे संचालक नरेंद्र मोहन, ‘को-जन इंडिया’चे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, ‘को-जन’चे महासंचालक संजय खताळ, रेणुका शुगर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता, h2e पॉवर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक  सिद्धार्थ मयूर, हायड्रोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (R&D) चे माजी संचालक डॉ.S.S.V.  रामकुमार, मुख्य समन्वयक अनिता खताळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘ग्रीन रिन्युएबल एनर्जीसाठी एकात्मिक धोरण’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया (को-जन इंडिया) यांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘नॅशनल को-जनरेशन अवॉर्ड्स 2023’ अंतर्गत देशातील को-जनरेशन प्रकल्प आणि त्यामध्ये काम करणा-या अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॅशनल को-जनरेशन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट को-जनरेशन मॅनेजर, बेस्ट इंस्ट्रुमेंटेशन मॅनेजर किंवा इनचार्ज, बेस्ट DM/W.T.P मॅनेजर किंवा इन-चार्ज आणि बेस्ट इलेक्ट्रिकल मॅनेजर या कॅटेगरीतील विजेत्यांचा समावेश आहे. तसेच संस्थात्मक श्रेणी अंतर्गत को-जन  प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 45 पुरस्कार देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here