मुंबई : साखर आणि इथेनॉल उद्योगाशी संबधित अत्यंत अचूक, खऱ्या, तपशीलवार आणि परिपूर्ण बातम्या देणाऱ्या ‘चिनीमंडी’ या भारतातील सर्वात मोठ्या पोर्टलने 50 लाख वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. ‘चिनीमंडी’ने जगभरातील वाचकांच्या विश्वासाच्या बळावर ही अतुलनीय कामगिरी केली आहे. 2018 मध्ये स्थापन झालेल्या ‘चिनीमंडी’ला वाचकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
या यशाबाबत भाष्य करताना, ‘चिनीमंडी’चे सह-संस्थापक आणि सीईओ उप्पल शाह म्हणाले, 50 लाख वाचकांचा विश्वास संपादन करणे, ही खूप मोठी कामगिरी आहे. जगभरातील लाखो वाचकांसह आपण योग्य मार्गाने वाटचाल करत आहोत, याची ही जणू पोहोचपावतीच आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. जस मी नेहमी म्हणतो, आकाश ही सुरुवात आहे, मर्यादा नाही..!®. मी माझ्या वाचकांचा आणि मार्गदर्शकांचा त्यांच्या पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हे पोर्टल त्यांनाच समर्पित आहे. या यशाबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचाही मनापासून आभारी आहे.
या यशाबद्दल ‘चिनीमंडी’चे अभिनंदन करताना, भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक (साखर), संगीत सिंगला म्हणाले, ‘चिनामंडी’ने 50 लाख वाचकांचा टप्पा ओलांडल्याचे जाणून मनापासून आनंद झाला. अचूक, तपशीलवार आणि वस्तुस्थितीदर्शक बातम्या वाचकापर्यंत पोहचणे आवश्यक असते आणि ‘चिनीमंडी’ हे साखर उद्योगाबद्दल अस्सल बातम्या आणि सर्वांगीण माहिती पुरवणारे एक सशक्त व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. मी ‘चिनीमंडी’च्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो आणि आशा करतो की ते साखर आणि जैवइंधन उद्योगांना यापुढेही अशीच अखंड सेवा देत राहतील.
एनएसआय-कानपूरचे संचालक श्री नरेंद्र मोहन म्हणाले कि, अत्यंत कमी कालावधीत असे यश संपादन करणे अभूतपूर्व आणि अनुकरणीय आहे. मला आशा आहे की, ‘चिनीमंडी’ यापुढेही भारतीय साखरेचा “गोडवा” जगभर पसरवत राहील. ‘चिनीमंडी’चे मनापासून अभिनंदन.
नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश नाईकनवरे म्हणाले, पाच दशलक्ष वाचकांचा टप्पा गाठल्याबद्दल ‘चिनीमंडी’चे मनापासून अभिनंदन. ‘चिनीमंडी’ खरोखरच भारतीय साखर क्षेत्राशी संबंधित सर्व माहितीचा स्रोत बनली आहे. ‘चिनीमंडी’ आपली वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झाली आहे.
श्री रेणुका शुगर्सचे कार्यकारी अध्यक्ष श्री अतुल चतुर्वेदी म्हणाले, साखर उद्योगाच्या विकासात आपले योगदान देत ‘चिनीमंडी’ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 5 वर्षांच्या अल्पावधीत ‘चिनीमंडी’ने 5 दशलक्ष वाचकांचा विश्वास संपादन करत आपले वेगळेपण जपले आहे. ‘चिनीमंडी’ पाहिल्याशिवाय माझी सकाळ पूर्ण होत नाही. ‘चिनीमंडी’ मला आमच्या साखर क्षेत्राबद्दल अपडेट ठेवते. ‘चिनीमंडी’ने लवकरच 10 दशलक्ष वाचकांचा टप्पा गाठावा, यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.