सांगली, दि. 5 : सध्या कोयना धरणातून 70 हजार 404 व वारणा धरणातून 11 हजार 703 क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सांगली आयर्विन पूल येथील पाणीपातळी सध्या 23 फुट असून सध्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास ती 30 ते 31 फुटापर्यंत पातळी स्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिक, शेतकरी यांनी सावधगिरी बाळगावी व सतर्क रहावे. नदी पात्रात जाणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजेपर्यंत कोयना-48 मिमि, महाबळेश्वर 25 मिमि, नवजा 73 मिमि, वळवण-57 मिमि अशी पर्जन्यवृष्टी झाली आहे. कोयना धरण पाणीसाठा 103.62 टी.एम.सी (99टक्के) इतका झालेला आहे. कोयना धरणाचे रेडियल गेट 10 फुटांवरुन 8 फूट करण्यात आले. तर पाण्याचा विसर्ग 85 हजार 673 क्युसेस वरुन 70 हजार 404 क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तसेच वारणा धरणातील विसर्ग 11 हजार 703 क्युसेक्स इतका आहे. आयर्विन पूल येथील पाणीपातळी सध्या 23 फुट असून सध्यस्थितीनुसार विसर्ग राहिल्यास ती 30 ते 31 फुटापर्यंत पातळी स्थिर होण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.