आजमगढ : सठियाव सहकारी साखर कारखान्याने २७ फेब्रुवारीपासून उसाचे गाळप बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कारखान्याच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त झाल्या. आता शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप केले जात नाही, तोपर्यंत सठियावर सठीयावचा किसान सहकारी साखर कारखाना सुरू राहणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा ऊस अधिकारी अशर्फी लाल यांनी स्पष्ट केले की, ऊस शिल्लक असताना जर साखर कारखान्याच्या प्रशासनाने गाळप बंद केले, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. याशिवाय, कारखाना बंद करण्यापूर्वी कारखान्याच्या प्रशासनाने तीन वेळा याबाबतची नोटीस जारी करणे गरजेचे आहे. जोपर्यंत ऊस विभागाकडून ना हरकत दाखला मिळत नाही, तोपर्यंत कारखाना बंद करण्यास अनुमती दिली जाणार नाही.