कोलंबो : अखेर ३० वर्षांपासून बंद पडलेला कांटाले साखर कारखाना ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. श्रीलंकेला साखरे मध्ये आत्मनिर्भर बनवणे ,हा कारखाना सुरू करण्यामागचा उद्देश आहे. गेल्या दोन वर्षामध्ये साखर आयातीसाठी २० बिलियन खर्च झाला आहे. कांटाले साखर कारखान्यासाठी मशिनरी इस्त्राईल मधून आयात करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही साखर उत्पादन योजना सर्वात पूर्वी घरगुती बाजारासाठी साखरेचे उत्पादन करेल आणि मग श्रीलंकेच्या निर्यात सूचीत समावेश होऊ शकते .
याशिवाय, कारखान्यात इथेनॉल ही उत्पादित केले जाईल, ज्यामुळे इथेनॉल ची आयात कमी करण्यात मदत झाल्याने विदेशी मुद्रेची बचत होईल. योजनेचे मूल्य जवळपास 400 करोड़ रूपयें आहे. याच्या गुंतणूकीतील विशेषता म्हणजे ही योजना 4,500 पेक्षा अधिक नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि तसेच 7,500 एकऱ पेक्षा अधिक ऊसाच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करेल. कारखान्याचा शेतकऱ्यांबरोबर करार देखील होईल. ज्यामुळे त्यांच्यासाठी स्थिर उदरनिर्वाहाचे साधन निश्चित होईल. कारखाना 30 वर्षाच्या लीज वर बिल्ड ओन आणि ट्रांसफर (बीओटी) योजनेच्या रुपात संचालित केले जाईल. सरकार, शेतकरी आणि संघ यांच्या मध्ये एक त्रि-पक्षीय करार होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.