ढाका : देशातील कोणताही साखर कारखाना कायमस्वरुपी बंद करण्यात आलेला नाही असे प्रतिपादन उद्योग मंत्री नूरुल मजीद महमूद हुमायूं यांनी केले. मंत्री नूरुल मजीद महमूद हुमायूं यांनी दर्शन केरू अँड कंपनी शुगर मिलच्या गळीत हंगामाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. सरकार कृषी उत्पादनांना अधिक सुविधा देत आहे असेही यावेळी मंत्री नुरुल म्हणाले.
यावेळी वाणिज्य मंत्री टीपू मुंशी, उद्योग राज्य मंत्री कमाल अहमद मुजुमदार, उद्योग सचिव जकिया सुल्ताना, साखर आणि अन्न उद्योग महामंडळाचे अध्यक्ष अरिफुर रहमान अपू, खासदार हाजी मोहम्मद अली अजगर तोगोर उपस्थित होते
वस्तूंच्या वाढत्या किंमतीबाबत वाणिज्य मंत्री टीपू मुन्शी यांनी सांगितले की, जर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या तर देशांतर्गत बाजारातही या किमती वाढतात. किमती स्थिर ठेवण्यासाठी उप जिल्हा स्तरावर टीसीबीची प्रक्रिया सुरू करावी लागेल. पुढील ३ महिन्यांत ४००-५०० टीसीबी ट्रक याच्याशी संलग्न असतील. समारंभाच्या अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहम्मद मुशर्रफ हुसैन होते. ते म्हणाले की, चालू हंगामात गाळप सुरू करण्यासाठी साखर कारखान्याने सर्व तयारी पूर्ण केली आहे. ऊसाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पाजनाचे उद्दीष्ट निम्म्यावर आले आहे. बांगलादेश सरकारने गेल्यावर्षी देशातील १५ सरकारी साखर कारखान्यांपैकी सातत्याने तोट्यात सुरू असलेले सहा कारखाने बंद केले आहेत.