मोतिहारी : बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील असे आश्वासन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी गोपालगंज आणि पूर्व चंपारण्य जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या विकास कामांची प्रगती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते म्हणाले की, बंद पडलेल्या सासामोसा साखर कारखान्याने आपली थकीत बिले दिली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या शेतकऱ्यांना त्वरीत पैसे मिळतील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जावे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार एक योचना तयार करेल. कारखाने सुरू करण्याच्या या प्रक्रियेत शेतकऱ्यांची ऊस बिले देण्याबाबत नियम तयार केले जातील. ते म्हणाले की, सासामोसा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून जर थकीत ऊस बिले दिली गेली नाहीत, तर शेतकऱ्यांना पैसे मिळावेत यासाठी सरकार आवश्यक ती कार्यवाही करेल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर घर जल योजनेबाबत सूचना केल्या.