हापुड, उत्तर प्रदेश: मेरठ विभागाच्या आढावा बैठकीमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री योंगी आदित्यनाथ यांनी हापुड च्या दोन साखर कारखान्यासह 5 साखर कारखान्यांकडून ऊस थकबाकी न भागवल्याने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला ताकिद दिली की, कारखाना व्यवस्थापनाने शेतकर्याचे पैसे द्यावेत अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई करावी.
लाईव्ह हिंदुस्तान डॉट कॉम मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सिंभावली साखर कारखाना, ब्रजनाथपूर शुगर, मोदीनगर साखर कारखान्यासह मेरठ कमिश्नरी च्या 5 साखर कारखान्याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत दिशा निर्देश दिले. माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजता सर्वप्रथम गाजियाबाद जिल्ह्याची आढावा करण्यात आली व या नंतर हापुड, दोन्हीही जिल्ह्यामध्ये डिफॉल्टर झालेल्या साखर कारखान्याच्या ऊस थकबाकीचाही मुद्दा आला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, ऊस थकबाकी भागवण्याबाबत कोणतेही कसूर सहन केली जाणार नाही. ज्यासाठी तात्काळ ऊस विभाग आणि साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला बोलावून थकबाकी भागवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शनिवारी एडीएम जयनाथ यादव यांनी सिंभावली तसेच ब्रजनाथपूर साखर कारखान्याचे व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हा ऊस अधिकारी व सचिवांना बोलावून ऊस थकाबाकीवर आढावा बैठक घेतली. एडीएम जयनाथ यादव यांनी सांगितले की, ऊस विभाग तथा कारखानदारांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी तात्काळ शेतकर्यांचे पैसे भागवावेत. जर शेतकर्यांना त्यांचे पैसे वेळेत मिळाले नाहीत, तर त्या कारखान्यांविरोधात वैधानिक कारवाईची अंमलबजावणी केली जाईल.
आढावा बैठक़ीत मुख्यमंत्र्यांनी बागपत, बुलंदशहराचे नाव घेण्याशिवाय इतर जिल्ह्यांनाही निर्देशित केले की, महसुली वसुली वर काम केले जावे. ज्याबाबत एडीएम जयनाथ यादव यांनी शनिवारीजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांच्या अधिकार्यांबरोबर बैठक घेतली. बैठकीमध्ये एडीएम यांनी सांगितले की, प्रति महिना राजस्व वसुली शंभर टक्के झाली पाहिजे. त्यांनी सांगितले की, स्टॅम्प, आबकारी आणि सेलटॅक्स मध्ये गेल्या दिवसांमध्ये क्रमश: 96 ते 90 टक्के वसुली झाली. पण कर्मिक आणि वार्षिक मध्ये काम होत नाही. ज्याबाबत सर्व विभागांनी वसुली वर काम करावे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.