लखनऊ: उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रदेशातील ऊस शेतकर्यांना 418 करोड रुपये हस्तांतरित केले. शुक्रवारी सकाळी एका क्लिकवर मुख्यमंत्र्यांनी हा निधी थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा केला. याबराबेरच उत्तर प्रदेश सरकारने ऊस शेतकर्यांना एक लाख करोड पेक्षाही अधिक निधी देवून ऊस थकबाकी भागवण्यात नवा विक्रम स्थिपित केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील काही ऊस शेतकर्यांशी विडियो कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. कोरोना काळात ऊसाची रक्कम मिळताच शेतकर्यांच्यात आनंदाची लहर उसळली. उत्तर प्रदेश चे माहिती संचालक शिशिर (आयएएस) यांनी ट्वीट केले की, मुख्यमंत्र्यांनी बटन दाबून ऊस शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील ऊस थकबाकी भागवण्यामध्ये सरकारकडून एक लाख करोड पेक्षा अधिक पैसे भागवण्याचा विक्रम केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार मृत्युजय कुमार यांनी सांगितले की, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऊस शेतकर्यांचे 418 करोड रुपयांचे देय भागवले. याबराबेरच 3 वर्षांमध्ये 1,00,325 करोड रुपयांची थकबाकी योगी सरकारने भागवली आहे. कोणत्याही सरकारने हे काम आपल्या 5 वर्षांच्या काळात केलेले नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ऊस शेतकर्यांच्या हितासाठी सुरुवातीपासूनच कटीबद्ध आहेत. 2007 पासून 2012 पर्यंत उत्तर प्रदेशातील 10 साखर कारखाने बंद होते, 2012 पासून 2017 पर्यंत 10 कारखाने बंद झाले, पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 3 वर्षामध्ये दीड डझन पेक्षाही अधिक कारखान्यांच्या क्षमतेत वृद्धी आणली जुने कारखाने सुरु केले आणि नव्या कारखान्यांचे संचालन केले.
प्रदेशामध्ये 48 लाख ऊस शेतकरी आहेत. त्यांचे हित लक्षात घेवून लॉकडाउन दरम्यान देखील प्रदेशात 119 कारखाने सुरु होते. प्रत्येक कारखान्यांशी 25 ते 40,000 इतके शेतकरी जोडलेले आहेत. प्रत्येक कारखाना 8 ते 10,000 लोकांना रोजगार देतो. लॉकडाउन दरम्यान या कारखान्यांमुळे या शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. एसएमएस पावती व्यवस्था, ई ऊस अॅप, टोल फ्री नंबर यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आणि ऊस माफियांची सफाईदेखील या सरकारने केली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये शेतकर्यांनी ई पावती सुविधेचे कौतुक केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.