सत्तेवर आल्यानंतर पाँडिचेरीत सहकारी साखर कारखाना: जे पी नड्डा

पाँडिचेरी: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की केंद्र शासीत प्रदेश पाँडिचेरीत आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष ३० पैकी २३ जागा जिंकेल. येथील एएफटी मैदानावर आयोजित जाहीर सभेत मड्डा बोलत होते.

अध्यक्ष नड्डा म्हणाले, भारतीय जनता पक्ष एका चांगल्या सरकारची स्थापना करेल आणि पाँडिचेरीमध्ये सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली जाईल. याशिवाय येथे अँग्लो-फ्रेंच टेक्स्टाइल मील पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू. या मीलचे आधुनिकीकरण केले जाईल.

अध्यक्ष नड्डा म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात पाँडिचेरी, कराईकल आणि यानम या ठिकाणी फ्लायओव्हर तयार केले जातील. याशिवाय पाँडिचेरी आणि कराईकल या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी नवीन रेल्वे योजना राबविण्याचा आमचा मानस आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here