राष्ट्रीय कोळसा निर्देशांक (एन. सी. आय.) हा एक दर निर्देशांक आहे जो अधिसूचित दर, लिलाव दर आणि आयात दरांसह सर्व विक्री माध्यमातील कोळशाचे दर एकत्रित करतो. वित्तीय वर्ष 2017-18 हे आधार वर्ष म्हणून हा स्थापित आहे. बाजाराच्या गतिशीलतेचे एक विश्वासार्ह सूचक म्हणून हा काम करतो. किंमतीतील चढउतारांबद्दल महत्वाची अंतर्दृष्टी प्रदान करतो.
राष्ट्रीय कोळसा निर्देशांकात नोव्हेंबर 2022 च्या 188.08 अंकाच्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये 17.54% ची लक्षणीय घसरण दिसून आली आहे. 2023 मधे तो 155.09 अंक होता. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पुरेशा उपलब्धतेसह बाजारात कोळशाचा भक्कम पुरवठा असल्याचे तो दर्शवतो. त्याचप्रमाणे, गैर-कोकिंग कोळशाचा एन. सी. आय. नोव्हेंबर 2023 मध्ये 143.52 वर आहे, जो नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत 25.07% ची घसरण दर्शवतो, तर कोकिंग कोळसा नोव्हेंबर 2023 मध्ये 188.39 वर आहे, ज्यात मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 5.79% ची वाढ झाली आहे. एन. सी. आय. जून 2022 मध्ये सर्वाधिक दिसून आला जेव्हा निर्देशांक 238.83 अंकांवर पोहोचला होता. परंतु त्यानंतरच्या महिन्यांमध्ये घसरण झाली. भारतीय बाजारपेठेतील मुबलक कोळशाचे ती सूचक आहे.
ही उपलब्धता कोळशावर अवलंबून असलेल्या विविध क्षेत्रांसाठी स्थिर पुरवठा सुनिश्चित करते, ज्यामुळे देशाच्या एकूण ऊर्जा सुरक्षेत लक्षणीय योगदान मिळते.
एन. सी. आय. मधील घसरणीचा कल, हा पुरवठा आणि मागणीची सांगड घालून, अधिक संतुलित बाजारपेठ दर्शवतो. पुरेशा कोळशाच्या उपलब्धतेसह, देश केवळ वाढत्या मागणीचीच पूर्तता करू शकत नाही तर त्याच्या दीर्घकालीन ऊर्जेच्या गरजा देखील पूर्ण करू शकतो. यामुळे अधिक लवचिक आणि शाश्वत कोळसा उद्योग तयार होऊन देशाचे समृद्ध भविष्य सुरक्षित होते.
(Source: PIB)