सिंगापूर : सिंगापूर च्या स्वास्थ्य मंत्रालयाच्या वतीने फिजी ड्रिंक्स आणि ज्यूसच्या जाहिरांतीवर प्रतिबंध लावण्यात येणार आहे. मंत्रालयाने सांगितले की, देशातील काही भागात जगातील सर्वात जास्त मधुमेहीं समोर आले आहेत. हे थांबवण्यासाठी साखरेच्या वापरावर अंकुश घालण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. हाय शुगर असणार्या पेयांवर आरोग्याची चेतावणी देणारे लेबल लावण्याची आवश्यकता आहे. सिंगापूरने केलेली ही कारवाई मेक्सिको आणि ब्रिटेन सारख्या देशांमध्ये करण्यात आलेल्या उपायांसारखी होईल. या देशात टीव्हीवर दाखवण्यात येणार्या आरोग्य विषयक आणि मुलांसाठी असणारी पेये आणि अन्नपदार्थ यांच्याशी संबंधित जाहीरातीत अधिक कॅलरीज ना थांबवण्यासाठी लेबल लावावे लागत आहे आणि त्याचा खुलासाही करावा लागतोे आहे.
साखर मंत्रालयाने सांगितले की, सर्वच प्रसारमाध्यमांवर कोका-कोला कंपनीच्या दाखवण्यात येणार्या जाहीरातीसाठी आम्ही काही गाईडलाइन्स जारी करणार आहोत. मंत्रालयाने सांगितले की,सिंगापूरात दारु पिणार्यांवर आणि आयातकांवर कर लावण्याचा विचारही सुरु आहे. काही पेयांच्या विक्रीवरही प्रतिबंध लावला जावू शकतो. कोका कोका कपंनीने सांगितले की, अशा उपायांचे आमच्याकडून स्वागतच आहे. आमची कंपनी आमच्या पेयात साखरेचे प्रमाण कमी करण्याचा पयत्न करेल. कोका कोला सिंगापूर अणि मलेशिया चे शहर मॅनेजर अहमद यहिया म्हणाले, आमच्या उत्पादनात आंम्ही साखरेचे प्रमाण कमी करु. सर्वांसाठी उत्तम असणारी उत्पादनेही आंम्ही आणणार आहोत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.