न्यूयॉर्क : कोका कोला कंपनीने आंतरराष्ट्रीय लाइफ सायन्स इन्स्टिट्यूटसोबत (आयएलएसआय) असलेली आपली दीर्घकालीन भागिदारी संपुष्टात आणली आहे. साखर उद्योगाचे हित जपून धोरणात्मक आणि संशोधनाच्या स्तरावर कार्यरत असलेल्या शक्तिशाली फूड ऑर्गनायझेशनला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, दिग्गज कंपनी कोका कोलाने या महिन्यात आपली वैश्विक, विभागीय आणि देश स्तरावरील आपले सदस्यत्व संपुष्टात आणले आहे. आपल्या नियमित परिक्षणानंतर कंपनीने अधिक माहिती न देता हा निर्णय घेतला आहे. 1978 मध्ये स्थापन झालेला हा ग्रुप अद्याप पेप्सिको इन आणि केलॉग्स आदी कंपन्यांच्या सदस्यत्वाच्या रुपाने सूचिबद्ध करतो. मात्र इन्स्टिट्यूटचा समर्थक असलेला हा ग्रुप एक मोठा आर्थिक पुरवठादार होता.