कोयम्बटूर: जिल्ह्यामध्ये सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी रिमझीम पाऊस झाला.तापमानही 28 सेल्सियस झाले. उस शेतकरी ऊसाच्या मोठया पिकाची आशा करत आहेत. जिल्ह्यात रविवारी केवळ 1.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली, पण पावसाने जिल्ह्यातील अधिक तापमानात घट कायम ठेवली.
तमिलनाडु कृषि विश्वविद्यालय च्या कृषि जलवायु अनुसंधान केंद्राचे निदेशक एस पी रामनाथन यांनी सांगितले की, आम्हाला अशा अपेक्षा आहे की आणखी दोन दिवस तरी वातावरण ढगाळ राहिल. स्काइमेट चे मुख्य हवामान तज्ञ महेश पलावत यांनी सांगितले की, आतापर्यंत झालेला पाऊस केरळ आणि कर्नाटक मध्ये मान्सून वारे वाढल्याने झाला, ज्यामुळे कोयम्बटूर सहित आंतरिक तमिलनाडु मध्ये पाऊस झाला. 25 सप्टेंबर नंतर पुन्हा पाउस होईल. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात ऊस पिक चांगले होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.