साओ पाउलो : ब्राझीलमध्ये थंडीच्या हवामानामुळे कॉफी आणि ऊसाच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. या थंडीच्या हवामानात ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व क्षेत्रामध्ये थंडीची तिसरी लाट आली आहे. गेल्या दशकभरात प्रथमच ही लाट आली आहे. ब्राझीलमध्ये आधीच गेल्या ९० वर्षांपासून प्रथमच खराब हवामानाचा फटका बसला आहे. त्यात आता थंडीच्या लाटेने चिंता वाढवली आहे.
याबाबत Wincountry.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ब्राझीलमधील उन्हाच्या कडाक्याने कॉफी, ऊस, मक्क्यासह अनेक पिकांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. मात्र, आता थंडीच्या लाटेमुळे उत्पादन आणखी घसरण्याची शक्यता आहे. कमोडीटी ब्रोकर मारेक्स स्पेक्ट्रम यांनी सांगितले की, ब्राझीलमध्ये काही ठिकाणी ऊसाचे क्षेत्र ३५ टक्क्यांपर्यंत खराब झाले आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन घटेल अशी शक्यता आहे. थंडीचा परिणाम पुढील वर्षी ऊस आणि कॉफीवर पडू शकतो.