महाराष्ट्राला थंडीपासून मिळू लागला दिलासा

मुंबई : महाराष्ट्राला थंडीपासून दिलासा मिळू लागला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणचे तापमान वाढले आहे. त्यामुळे थंडीचा पारा घसरू लागला आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी काही प्रमाणात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश ठिकाणी हवामान चांगले राहिले. तर सकाळी आणि सायंकाळी धुक्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने सागितले की १४ फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहील. आणखी काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नाही. मात्र, त्यानंतर थंडी कमी होऊन उन्ह वाढेल. बहुतांश शहरांतील वायू प्रदूषण सूचकांक मध्यम अथवा समाधानकारक श्रेणीत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात वाढ दिसून आली आहे. हवेची गुणवत्ताही समाधानकारक स्थितीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here