दिल्ली-एनसीआरमध्ये थंडीची लाट, यलो अलर्ट जारी

नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमालयातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे. यासोबतच दिल्ली-यूपीसह उत्तर भारतातील अनेक राज्ये धुक्याच्या गर्तेत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली. हवामान खात्याने बुधवार ते शनिवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार येत्या काही दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. यासोबतच शुक्रवार आणि शनिवारीही थंडीचे दिवस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

टीव्ही९हिंदीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दिल्ली एनसीआरमध्ये सहा जानेवारीपर्यंत तापमान चार अंशांपर्यंत पोहोचेल असे म्हटले आहे. हिमालयातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मैदानी भागात थंडी वाढली आहे दिल्लीत पारा घसरला आहे. आयएमडीने सांगितले की, लोधी रोड, पालम, जाफरपूर आणि मयूर विहारसह राष्ट्रीय राजधानीतील अनेक ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी झाले. सकाळच्या वेळी राष्ट्रीय राजधानीच्या काही भागांमध्ये उथळ धुक्यामुळे दृश्यमानता घटली आहे. त्यामुळे वाहनांच्या हालचालींवर परिणाम झाला. दाट धुक्याने रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे आणि विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. दिल्लीतील खराब हवामानामुळे सोमवारी रात्री पाच उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आल्याची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही कडाक्याची थंडी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here