भठिंडा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या दाट धुकामुळे आणि थंडीच्या लाटेमुळे शेतकऱ्यांना खुश केले आहे. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यनुसार गहू पिकाला हवामानाची स्थिती पोषक आहे. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीलाच्या थंडीच्या हवामानात गव्हाची वाढ चांगली होईल आणि हवामानाची स्थिती गव्हाच्या विकासासाठी पू्र्ण अनुकूल आहे. परिणामी या हवामानात पिकाचे उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे. थंडीचे हवामान गव्हाच्या पिकासाठी खूप चांगले आहे. काही दिवसांपासून तापमान अधिक होते. ते पिकांच्या वाढीसाठी योग्य नव्हते. शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी खते तसेच किटकनाशकांचा वापरही केला पाहिजे.
या टप्प्यावर गव्हाच्या पिकावर थंडीच्या लाटेचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. याउलट थंडीची स्थिती पिकासाठी उपयुक्त ठरेल असे शिंगारा सिंह यांनी सांगितले. भारतीय हवामान विभागाने २१ डिसेंबरपासून अमृतसर, तरनतारन, कपूरथला, जालंधर, लुधियाना आणि पटियाळा येथे दाट धुक्याची शक्यता वर्तवली. हवामान विभागाने सांगितले की, पुढील चार ते पाच दिवसांत पंजाबमध्ये विविध ठिकाणी थंडीची लाट सक्रीय राहिल. तर बहुतांश ठिकाणी दाट धुके असेल.