नवी दिल्ली / मुंबई : मध्य आणि उत्तर भारतातील सध्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना यावर्षी गव्हाचे भरघोस पीक घेण्यास मदत होऊ शकते, परंतु तापमानात अचानक वाढ झाल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. चीननंतर जगातील सर्वात मोठा धान्य उत्पादक देश असलेल्या भारतासाठी यंदा गव्हाचे पीक महत्त्वाचे आहे. उष्ण आणि अवेळी उष्ण हवामानामुळे २०२२ आणि २०२३ मध्ये भारताच्या गव्हाच्या उत्पादनात घट झाली. सलग तिसऱ्या वर्षी खराब पिक असल्यास भारताकडे गहू आयात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
प्रदीर्घ थंडीमुळे गव्हाचे पिक वाढीस मदत झाली आहे. परंतु पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे धान्य निर्मितीच्या टप्प्यात पिकावर परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारच्या गहू संशोधन संचालनालयाचे संचालक ज्ञानेंद्र सिंग यांनी रॉयटर्सला सांगितले की, थंड हवामानामुळे आम्हाला सामान्य ३.५ टन प्रती हेक्टरपेक्षा किंचित चांगले उत्पादन अपेक्षित आहे आणि त्यामुळेच आम्ही ११४ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनाची अपेक्षा करत आहोत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पेरणीला संथ सुरुवात झाल्यानंतर, थंड हवामानामुळे पिकाला मदत झाली आहे, परंतु एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत हवामान अनुकूल राहणे आवश्यक आहे. हरियाणाचे रवींद्र काजल म्हणाले, कमी तापमानामुळे आमच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सरकारी भारतीय हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर आणि उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये किमान आणि कमाल तापमान दोन्ही वाढू लागले आहे. फेब्रुवारीमध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा ५ अंश सेल्सिअसने जास्त होते. जो भारताच्या धान्य पट्ट्याचा भाग आहे. २०२३ मध्ये भारतातील गव्हाचे पीक सुमारे ११२ दशलक्ष मेट्रिक टनांच्या सरकारच्या अंदाजापेक्षा किमान १० % कमी होते. परिणामी, गव्हाचा साठा सात वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला.
सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या कमोडिटी परिषदेत एका धान्य व्यापाऱ्याने सांगितले की, स्थानिक गव्हाचा पुरवठा कमी होत आहे आणि भारताला धान्य आयात करण्याची गरज आहे. यावर्षी गव्हाचे विक्रमी ११४ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन होईल असा सरकारचा अंदाज आहे.