मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत थंडीची लाट तीव्र होणार : आणखी तीन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातही थंडीचा कडाका आणखी सुरू आहे. बर्फाळ हवेमुळे मध्य आणि पश्चिम भारतात थंडी पसरली आहे. भारतीय हवामान विभागाने थंडीच्या लाटेपासून आणखी दिलासा मिळणार नसल्याचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत कडाक्याची थंडी पडली आहे. रात्री थंडीचा तडाखा वाढेल. मध्य प्रदेशातील पंचमढीत शुक्रवारी एक डिग्री तापमान नोंद झाली आहे.

याबाबत आजतक डॉट इनने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, उत्तर – पश्चिम आणि मध्य भारतात १०-२० किलोमीटर प्रती तास वेगाने हवा वाहतील. त्यामुळे तापमान २-४ डिग्री सेल्सिअसची घसरण होवू शकते. मध्य प्रदेशात वेगवेगळ्या शहरात थंडीची स्थिती कायम राहील. याशिवाय छत्तीसगड आणि विदर्भात तापमानात घसरण नोंदवली जाईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर पुढील ३-४ दिवस पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राज्यस्थान, मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगडमध्ये थंडीपासून दिलासा मिळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here