चंदगड :अथर्व दौलत कारखान्याने अडीअडचणीवर मात करत योग्य गाळप केले असून चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील ऊस उत्पादक शेतक़र्यांनी अथर्व-दौलत साखर कारखान्यावर आपला विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस उत्पादकांची ऊस बीले जमा केली आहेत. त्याचप्रमाणे तोडणी वाहतुकीची बीले देखील वेळचेवेळी अदा केली जात आहेत. याबाबतची माहिती अर्थवचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.
अथर्व-दौलत साखर कारखान्याकडे 31 डिसेंबर 2019 अखेर गाळपासाठी आलेल्या उसाची बीले ऊस उत्पादक शेतक़र्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तसेच येथून पुढेही ऊस उत्पादकांनी सहकार्य करून पिकविलेला संपूर्ण ऊस अथर्व-दौलत साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.