शाहजहांपूर : ऊस खरेदी केंद्रांतील वजनाची चोरी रोखण्यासाठी जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव यांनी रविवारी रोजा आणि तिलहर या साखर कारखान्यांच्या अनेक खरेदी केंद्रांची पाहणी केली. यावेळी वजन काट्याची तपासणी करण्यात आली. हे काटे योग्य असल्याचे आढळले. मात्र, इतर अनेक बाबींमध्ये अनियमीतता आढळली. यादरम्यान, केंद्राच्या प्रभारींनी यात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी उमेश प्रताप सिंह यांनी निरीक्षणात आढळलेल्या त्रुटींबाबत साखर कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. साखर कारखान्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्याचे साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी ऊस खरेदीतील काटामारी रोखण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना ऊस खरेदी केंद्रांची नियमित पाहणी करण्यास सांगितले आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी पाच कारखान्यांच्या खरेदी केंद्रांची २६१ वेळा पाहणी केली आहे. वजन काटा दर १५ दिवसांनी तपासला जात आहे. रविवारच्या तपासणीत अनेक ठिकाणी ऊस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी निवारा, पाण्याची सोय, कागदपत्रांची योग्य व्यवस्था आदी त्रुटी आढळल्या. त्यांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. बिर्ला ग्रुपचा रोजा कारखाना, निगोही साखर कारखान्यासह पुवाया आणि तिलहर कारखान्याला नोटीस बाजवण्यात आली आहे. आतापर्यंत तिलहर कारखान्याने १४ लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १६५ लाख क्विंटल उसाची खरेदी केली असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. खुशीराम भार्गव यांनी सांगितले.