कोल्हापूर: कसबा बावडा येथील “राजाराम’ कारखान्याने 15 फेब्रुवारीपर्यंत तोडलेल्या ऊसाची शेतकऱ्यांची बिले या पूर्वीच भागवलीआहेत. तसेच कारखान्याने आतापर्यंत गाळप झालेल्या सर्व ऊसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिल्याची माहिती कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक व अध्यक्ष सर्जेराव माने यांनी दिली.
राजाराम साखर कारखान्याची 16 फेब्रुवारी 2020 ते 10 मार्च 2020 या कालावधीतील एफआरपी देय होती. या काळात 58 हजार 525 टन ऊसाचे गाळप कारखान्याने केले. त्यानुसार ऊस बिलाचे 16 कोटी 23 लाख रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा बॅंकेच्या शाखात आज भरण्यात आले आहेत. ही रक्कम प्रति टन 2774 रूपये प्रमाणे अदा केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदाच्या हंगामात कारखान्याने 3 लाख 42 हजार 588 टन ऊसाचे गाळप केले आहे. सध्याच्या लॉकडाउन च्या संकट काळात एफआरपीची पूर्ण रक्कम ऊस उत्पादकांना मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना दिलासा मिळाला आहे. या हाती आलेल्या रकमेमुळे अर्थिक अडचणी सोडवण्यास मदत होत होईल, अशी भावना महाडिक यांनी व्यक्त केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.