इस्लामाबाद: पाकिस्तानमधील वाढत्या महागाईने रमजानचा उत्साह कमी झाला आहे. देशातील लोक पवित्र महिन्याची तयारी करीत आहेत. मात्र, महागाईचा भार सहन करणे त्यांना कठीण बनले आहे. देशातील वाढत्या महागाईने या वर्षी नागरिकांना खास करुन कठीण स्थितीत टाकले आहे.महागाईमुळे सणांमधील पुजा आणि स्वादिष्ट अन्नावर पाणी फेरले गेले आहे. महागाईने पाकिस्तानातील सर्वात गरीब लोकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
डीडब्लू न्यूजच्या रिपोर्टनुसार, खजूर ३.५ युरो प्रती किलो दराने विक्री केले जात आहेत. त्यांची खरेदी करणे अनेक कुटुंबांना मुश्किल झाले आहे. पाकिस्तान सर्वात खराब आर्थिक संकटाच्या टप्प्यातून पुढे जात आहे. महागाई ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान सरकार नेहमी रमजानच्या महिन्यात पॅकेज देते. मात्र, या वर्षी रोकड टंचाईने सरकारकडे देण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे आतापर्यंत सरकारने सवलतीच्या दरात आट्याची व्यवस्था केली आहे.
महागाई एवढी वाढली आहे की, गेल्यावर्षी पाकिस्तानी २०० रुपये किलो असलेल्या वस्तूंची किंमत आता ५०० रुपये किलो झाली आहे. तर पेट्रोल, बससह घरभाडे आदी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. २३ मार्च रोजी संपलेल्या सात दिवसांच्या कालावधीत गव्हाच्या आट्याच्या सर्वोच्च दराने पाकिस्तानचा साप्ताहिक महागाईचा दर आठवड्याच्या तुलनेत १.८० टक्के आणि वार्षिक दर ४६.६५ टक्क्यांवर पोहोचवला आहे. त्यामुळे पुढे आणखी गंभीर स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता आहे. शुक्रवारी पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) च्या आकडेवारीने संवेदनशील मूल्य निर्देशांक (एसपीआय) मधील वाढीसाठी टोमॅटो (७१.७७ पीसी), गव्हाचा आटा (४२.३२पीसी), बटाटे (११.४७पीसी), केळी (११.०७पीसी) चहा (७.३४ पीसी), जॉर्जेट (२.११ पीसी), लॉन (१.७७ पीसी), लांब कापड (१.५८ पीसी), पल्स मॅश (१.५७ पीसी), तयार चहा (१.३२ पीसी) आणि गुळ (१.०३ पीसी) च्या किमतीमधील वाढीला जबाबदार ठरवले आहे.