गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उस गाळपामध्ये गती घेतली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) नुसार, गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर, 2019 ला उसाचे गाळप करणारे 127 साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी 15 नोव्हेंबर, 2020 ला 274 साखर कारखाने उसाचे गाळप करत आहेत.
या हंगामात चांगले पीक उत्पादन आणि गाळप वेळेवर सुरु झाल्याने उत्पादनातही वाढ झाली आहे. चालू हंगाम 2020-21 मध्ये 15 नोव्हेंबर, 2020 पर्यंत साखरेचे उत्पादन 14.10 लाख टन आहे, जे गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2019 ला 4.84 लाख टन होते.
इस्माच्या नुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये चांगला पाउस आणि जलाशयांमध्ये पुरेशा पाण्याची उपलब्धता, उसाचे अधिक उत्पादनामुळे उसाच्या चांगल्या उपलब्धतेमुळे, ऑक्टोबर 2020 च्या शेवटच्या आठड्याच्या दरम्यान गाळप हंगामाची सुरुवात चांगली होवू शकली.