भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) अदानी पॉवर लिमिटेड या कंपनीला लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड या कंपनीच्या 100% संपादनाला मंजुरी दिली आहे.
अदानी पॉवर लिमिटेड (अधिग्रहणकर्ता), ही अदानी समुहाचा भाग असलेली कंपनी असून, ती भारतीय कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आली आहे. ही कंपनी भारतात औष्णिक ऊर्जा निर्मितीचा व्यवसाय करते. ही कंपनी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि मध्यप्रदेश यासह भारतातील अनेक राज्यांमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवते.
अदानी समूह हा संसाधने, लॉजिस्टिक्स आणि ऊर्जा या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधील व्यवसायांसह, जागतिक एकात्मिक पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी आहे.
लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड (अधिग्रहित), ही लॅन्को समूहाचा भाग असलेली कंपनी, भारतात औष्णिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. ही कंपनी, सध्या नादारी आणि दिवाळखोरी अधिनियम 2016 (IBC) अंतर्गत प्रक्रियाधीन आहे.
प्रस्तावित संयोजन हे अधिग्रहणकर्त्याद्वारे या दिवाळखोरीतील कंपनीच्या 100% भाग-भांडवलाच्या संपादनाशी संबंधित आहे.
सीसीआय द्वारे तपशीलवार आदेश जारी केला जाईल.
(Source: PIB)