शेतकरी, ट्रक मालकांकडून देणी भागवण्याबाबत तक्रारी

पोंडा : संजवनी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांनी मंगळवारी तक्रार केली की, गेल्या वर्षी कर्नाटकात असणार्‍या साखर कारखान्याला ऊस गाळप केल्याचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. गेल्या वर्षी, गोवा सरकारने सागितले होते की, संजीवनी साखर कारखान्याची मशिनरी खराब झाली आहे. आणि वर्ष 2019-20 साठी गाळप हंगाम आयोजित करणे शक्य नाही आणि शेतकर्‍यांना सर्व उत्पादीत ऊस खरेदी करण्याचे वचनही दिले होते. त्यानुसार, शेतकर्‍यांनी कर्नाटकातील खानापुर येथील साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा केला होता. त्यावेळी काही प्रमाणात पैसे दिले होते पण आताही बरेच देय प्रलंबित आहे.

ऊसाचे पैसे दिल्याशिवाय शेतकरी कसे जिवंत राहतील? असा प्रश्‍न शेतकरी संघाचे सदस्य हर्षद प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, त्यांना राज्य सरकारकडून कर्नाटक च्या कारखान्याला गाळप केलेल्या उसाचे बिल भागवण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, पण आताही ते बिल प्रलंबित आहे. गोव्यातील शेतकर्‍यांनी कर्नाटक स्थित लैला साखर कारखान्याला 27,000 मेट्रीक टनपेक्षा अधिक ऊस गाळप केला होता. कारखान्याकडून शंभर टक्के पैसे भागवण्यात आलेले नाहीत. दरम्यान, गोव्यातील शेतकर्‍यांचा ऊस वाहतुक करणार्‍या जवळपास 35 ट्रक मालकांनीही हे सांगितले की, त्यांचीही बिले कर्नाटक स्थित साखर कारखान्याकडून भागवली गेली नाहीत. त्यांनी याबाबत संजीवनी साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. अधिक़ार्‍यांनी त्यांना वाहतुक ठेकेदाराशी संपर्क करण्यास सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here