सोलापूर : ओंकार साखर कारखान्याच्या चांदापुरी युनिटच्यावतीने गळीत हंगामाचा सांगता समारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोत्रे – पाटील यांच्या हस्ते बैलगाडीवान दत्ता निर्मल (बीड), ऊस तोडणी कामगार, ऊस वाहनचालकांचा सन्मान करण्यात आला. ओंकार साखर परिवाराचे चेरअमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गळीत हंगामात कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सर्व उपपदार्थनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत असे त्यांनी जाहीर केले.
बोत्रे-पाटील म्हणाले की, आगामी गळीत हंगामाचे नियोजन आतापासूनच करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, ठेकेदार यांना कारखान्याच्या वतीने जे देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करू. यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊसतोडणी कामगार ऊस वाहतूकदार चालक-मालक व ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी कर्मचाऱ्यांची मोलाची साथ मिळाली. यावेळी जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, शरद देवकर, तानाजी देवकते, पी. डी. पाटील, मोहन घोडके, रमेश आवताडे, गणेश धायगुडे, ऊस उत्पादक शेतकरी रामचंद्र मगर, सर्जेराव पिंगळे, राहुल मगर, नितीन जाधव आदी उपस्थित होते. विष्णू गोरे यांनी आभार मानले.