ऑटो OEMsसाठी इथेनॉल मिश्रणाचे निकष पाळणे हे मोठे आव्हान नाही: ICRA

नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाद्वारे उत्सर्जन आणि सुरक्षेबाबत प्रमुख तांत्रिक बदलांवर काम केले जात आहे. ऑटो OEMsना प्रस्तावित इथेनॉल मिश्रणाच्या मानदंडांचे पालन करण्यासाठी खूप मोठ्या आव्हानांचा समाना करावा लागण्याची शक्यता नाही, असे रेटिंग एजन्सी ICRA द्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासानुसार, देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात पेट्रोल हेच पसंतीचे इंधन बनले आहे. सीएनजी वाहनांमध्ये अलिकडच्या वर्षात वाढ झाली आहे. मात्र, देशभरात सीएनजी वितरण स्टेशनच्या सुधारणांची गरज आहे.

Icra लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समुह प्रमुख शमशेर दिवाण यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षात सीएनजी, ईव्ही आणि हायब्रीड वाहनांच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांची वाढ होईल. दिवाण यांनी सांगितले की, सीएएफई मानदंड पूर्ण करण्यासआठी पेट्रोल आधारित वाहनांपासून उत्सर्जन कमी करणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण हळूहळू वाढत आहे. आणि भारताने २०२२ मध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला आहे. याशिवाय, भारत सरकारने २०३० पूर्वी, २०२५ पर्यंत ई २० मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here