सांगली : दालमिया भारत शुगर दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध सोयीसुविधा पुरवतो. समाजाची शैक्षणिक आणि सामाजिक उन्नती होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन दालमिया भारत शुगरचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले. तालुक्यातील प्राथमिक शाळांना करूंगली (ता. शिराळा) येथे दालमिया भारत शुगर या साखर कारखान्याने संगणक प्रदान केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मॉडेल स्कूल कोकरूड नंबर १, जिल्हा परिषद शाळा, करमाळे, पणुंब्रे तर्फ वारूण, तडवळे आणि सागाव नंबर २, शिरसी उपवळे या शाळांना कारखान्याकडून प्रदान करण्यात आला. करमाळे शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक रोकडे यांनी आभार मानले. महेश कवचाळे, चिंतामणी पाटील, सुनील माजगावकर, तडवळेचे सरपंच सचिन पाटील, कोकरुडचे मुख्याध्यापक महादेव पाटील, मन्सूर नायकवडी, नितीन पाटील, अनिल पाटील, शंकर येळवे, मोहन पाटील, शिवाजी पाटील, सचिन फल्ले, सुहास पाटील, उदय चव्हाण, मीनाताई चव्हाण, सुजाता शेटे, रोहित चव्हाण, विनोद दिवे आदी उपस्थित होते.