सोलापूर : वेणुनगर येथील कारखाना कार्यस्थळावर ९ ते १५ मे या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळाचे आयोजन करण्यात आले. रखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत हभप प्रा. तुकाराम महाराज मस्के, हभप आण्णा महाराज भूसनर यांचे नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा झाला.
कारखान्यातील विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम-लक्ष्मण-सीता, मारुती या देवतांच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिनानिमित्त व संत तुकोबारायांच्या शतकोत्तर अमृत बिजोत्सावानिमित्तने आयोजित कार्यक्रमांत सायंकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये हभप संगीत विशारद भागवताचार्य राणी सिदवाडकर यांचा भागवत कथा ज्ञानयज्ञ झाला. सप्ताहामध्ये कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी अन्नदानात सहभाग नोंदविला. हभप डॉ. किरण महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, सभासद, अधिकारी, कर्मचारी, भाविक उपस्थित होते.