पुणे : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माळेगाव कारखान्याचा गाळप हंगाम फार अडचणीचा होता. ऊस उत्पादनाचा अंदाज आणि प्रत्यक्षात झालेले उत्पादन यामुळे हंगाम कसरतीचा बनला होता. परंतु ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी कामगार व वाहतूकदारांसह कारखान्याच्या कामगारांच्या अथक परिश्रमातून हंगाम यशस्वी झाला, असे प्रतिपादन असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप यांनी केले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याने १६२ दिवसांच्या गाळप हंगामात १३ लाख २८ हजार टन ऊस गाळप करून १५ लाख १३ हजार ४०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतल्याचे ते म्हणाले.
गाळप हंगाम सांगता समारंभानिमित्त ऊस वाहतूकदार व तोडणी कामगार यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याचे संचालक मदननाना देवकाते यांनी कारखान्याच्या मागील काही गाळप हंगामाचा ऊहापोह केला. संचालक राजेंद्र ढवाण, ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. नीलकंठेश्वर सेवा संघाचे मधुकर फाळके यांनी संयोजन केले. उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, अनिल तावरे, प्रताप आटोळे, सागर जाधव, सुरेश देवकाते, ऊस वाहतूकदार संघटनेचे उपाध्यक्ष सागर तावरे, सचिन मोटे, बापूराव देवकाते, अधीक्षक जवाहर सस्ते, धनंजय निंभोरे, सुरेश काळे, अनिल वाबळे, विकास फडतरे, ज्ञानेश्वर तावरे उपस्थित होते.