ऊसावरील कीड नियंत्रणासाठी ड्रोनच्या वापराला सशर्त परवानगी

नवी दिल्ली : ऊस पिकातील कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर करण्याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने लखनौच्या भारतीय ऊस संशोधन संस्थेला (आयआयएसआर) सशर्त परवानगी दिली आहे.

लखनौस्थित आयआयएसआरला दिलेली ही ड्रोन वापराची परवानगी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वैध असेल. याशिवाय ड्रोन वापराबाबत आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, नियमांचे कठोरपणे पालन करावे लागेल. जर एखाद्या नियमांचे जरी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास नागरी उड्डाण मंत्रालय आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून कारवाई केली जाऊ शकेल असेही आयआयएसआरला बजावण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here