सातारा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. तर दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जयवंत शुगर्सला जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पुरस्कारांबद्दल डॉ. भोसले यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार ‘व्हीएसआय’ने जाहीर केले आहेत. यामधील दोन पुरस्कारांनी कृष्णा व जयवंत शुगर्स कारखान्याच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे रोवले गेले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून ऊस विकास संवर्धन योजना व उपक्रम राबविले जातात. त्यांचे हे यश असल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. दोन्ही संस्थांच्या यशाबद्दल डॉ. भोसले यांचे अभिनंदन होत आहे.