डेहराडून : ऊस उत्पादक शेतकऱ्याची थकीत बिले देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांनी मंगळवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा भवनाबाहेर धरणे आंदोलन केले. सत्र सुरू होण्यापूर्वी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते (एलओपी) यशपाल आर्य आणि माजी प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) अध्यक्ष प्रितम सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सदस्यांनी विधानसभेच्या मुख्य भवानाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर बसून जोरदार निदर्शने केली.
हातामध्ये ऊस घेऊन उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांच्या दुर्देशेबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला. भाजप सरकारवर टीका करताना विरोधी पक्षनेते आर्य म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने देशातील सार्वजनिक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वने तसेच संसाधनांना आपल्या उद्योगपती मित्रांना विक्री करण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आता सरकारची नजर शेतकरी आणि शेतीवर आहे. डीएपी, पोटॅश, खते, डिझेल आणि कीटनाशकांच्या किमतीमध्ये वाढ केल्यानंतर सरकारने ऊस समर्थन मूल्य जाहीर केलेले नाही. आर्य यांनी सांगितले की, उसाचे समर्थन मूल्य जाहीर न करता धामी सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करीत आहे.