लाहोर, पाकिस्तान: पाकिस्तानामध्ये ऊस शेतकर्यांना सरकारकडून लवकरच दिलासा मिळू शकतो. पाकिस्तानचे पंजाब सरकार येणार्या गाळप हंगामासाठी एफआरपी वाढवण्यावर विचार करत आहे. जेणेकरुन उत्पादकांना सुविधा प्रदान केली जावु शकेल आणि वाढत्या खर्चाच्या मूल्याला पूर्ण करण्यात त्यांची मदत केली जावू शकेल. पंजाब ऊस बोर्डाची बैठक 5 ऑक्टोबर ला होणार आहे, ज्यामध्ये प्रस्तावावर चर्चा होईल आणि भागधारकांमध्ये या विषयावर साधारण सहमती विकसित केली जाईल.
दरम्यान, ऊस आयुक्त पंजाब कार्यालयाने उत्पादकांना थकबाकी भागवण्यामध्ये झालेल्या कारखान्यांच्या चुकीविरोधात एफआयआर दाखल करणे कायम ठेवले आहे. सोमवारी पंजाब शुगर फॅक्टरीज (कंट्रोल) अधिनियम, 1950 अंतर्गत देपालपूर (जिल्हा ओकारा) मध्ये स्थित अद्बुल्ला 1 साखर कारखाना लिमिटेड विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. पाकिस्तानात साखर उद्योगातील घोटाळ्यामुळे गोंधळ माजला आहे, ज्यामुळे सरकार आणि साखर उद्योग आमोरा समोर उभे आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.