यमुनानगर : आता कामगारांच्या कमतरतेमुळे ऊसाची तोडणी खंडित होणार नाही. कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाने अनुदानावर शुगरकेन हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात तीन आणि यमुनानगरमध्ये एक केन हार्वेस्टर दिला जाणार आहे. याची किमत एक कोटी रुपये आहे. मात्र, यावर ६० हजार रुपये अनुदान दिले जाईल. हार्वेस्टरने एका दिवसात ३० एकरची तोडणी होऊ शकते. यातून वेळ आणि पैशांची चांगली बचत होईल.
याबाबत जागरण डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, यमुनानगरमध्ये २०१६-१७ मध्ये ८० हजार एकर क्षेत्रात उसाची लागवड केली गेली होती. आता २०२०-२१ मध्ये हे क्षेत्र ८५ हजार हेक्टर झाले आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हंगामात कामगारांची समस्या भेडसावते. यमुनानगरमध्ये प्लायवूड इंडस्ट्री असल्याने शेतीच्या कामाला मजूर मिळत नाहीत. ऊस पिक कामगारांवर आधारित आहे. तोडणीसाठी हरियाणात बिहार, उत्तर प्रदेशातील मजूर येतात. ऊस तोडणीचा दर प्रती क्विंटल ४५-५० रुपये प्रती क्विंटल आहे. ८-१० मजूर एका दिवसात ६० ते ८० क्विंटल उसाची तोडणी करतात. अनेकदा वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. सरस्वती शुगरमध्ये इथेनॉल प्लांट सुरू झाल्याने उसाची मागणी वाढली आहे.