नवी दिल्ली : बांधकाम आणि उपकरण उद्योगाने इथेनॉल आणि मिथेनॉल यांसारख्या पर्यायी इंधनाचा वापर करून आपला इंधनावरील खर्च कमी करण्याचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मंत्री गडकरी येथे भारतीय बांधकाम आणि उपकरण निर्माता संघाच्या (ICEMA) वार्षिक अधिवेशनात बोलत होते. मंत्री गडकरी यांनी नेहमीच इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या बहुपर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे.
मंत्री गडकरी म्हणाले की, २५ रुपये प्रती लिटर दराने मिळणाऱ्या मिथेनॉलचा वापर करून बांधकाम आणि उपकरण उद्योगाचा खर्च १५ ते २० टक्क्यांनी कमी होवू शकतो. यामुळे उद्योगाचा एकूण खर्च कमी होईल. १००० कोटी रुपयांच्या रस्ते निर्मिती प्रकल्पातही आता १०० कोटी रुपयांचा खर्च डिझेलवर होतो. जर बाँधकाम उद्योग इथेनॉल, मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनावर चालू लागले तर हा खर्च कमी होऊ शकतो आणि यातून प्रदूषण घटविण्यासही मदत होईल.