भुदरगड साखर कारखान्याच्या उभारणीने रोजगार निर्मिती होणार

कोल्हापूर : आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासाठी भुदरगड तालुका सहकारी साखर कारखान्याची उभारणी बळ देणारी ठरणार आहे. आबीटकर यांनी यापूर्वी दोन वेळा ‘बिद्री’ कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवली. पण दोन्ही वेळा अपयश आले. त्यामुळे काठावरील कार्यकर्त्यांत चलबिचल होती. कार्यकर्त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्यासाठी साखर कारखान्यासारखा दुसरा पर्याय नाही. त्यामुळे साखर कारखाना उभारणीचा प्रयत्न त्यांना बळ देणारा ठरू शकतो. या कारखान्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.

भुदरगड तालुक्याचे क्षेत्र २७ हजार ३९९ हेक्टर इतके आहे. यापैकी उसाचे क्षेत्र ७,३९० हेक्टर आहे. उसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी ८० टन असून एकूण ऊस उत्पादन ५.५० लाख टन होते. हा कारखाना प्रतिदिन ३५०० टन क्षमतेचा असून ‘राधानगरी’चे माजी आमदार शंकर धोंडी पाटील हे कारखान्याचे प्रवर्तक होते. कर्नाटकातील काही कारखान्यांसह दूधगंगा-वेदगंगा बिद्री, इंदिरा महिला कारखाना तांबाळे, दालमिया शुगर्स आसुर्ले पोर्ले, शाहू कागल, सदाशिवराव मंडलिक-हमीदवाडा, संताजी घोरपडे कापशी, फराळे – राधानगरी या कारखान्यांना तालुक्यातील ऊस पुरवठा होतो. साखर कारखान्याचे संचालकपद हा कार्यकर्ते जोडण्यासाठी चांगला पर्याय असतो. ‘भुदरगड’मध्ये उसाचे उत्पादन, कारखान्यांची संख्या आणि दरातील चढाओढ पाहता नवीन कारखाना काढून तो चालवणे तेवढे सोपे नाही. पण, आमदार आबीटकर यांचा प्रयत्न त्यांच्यासाठी मोलाचा ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here