जयपूर : सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी, सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केला नाही. जयपूरमध्ये सध्या पेट्रोल ९७ रुपये ७२ पैसे तर डिझेलचा दर ८९ रुपये ९८ पैसे प्रतिलिटर आहे. तेल कंपन्यांनी गेल्या शनिवारी पेट्रोलच्या दरात २५ पैसे तर डिझेलच्या दरात १६ पैशांची वाढ केली होती. नव्या वर्षात आतापर्यंत पेट्रोल ८ रुपये २ पैसे आणि डिझेल ८ रुपये ३० पैशांनी महागले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी नव्या वर्षात एकूण २६ वेळा दरात बदल केला आहे. राजस्थान सरकारने दिलासा देत व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र, नंतरच्या दरवाढीमुळे त्याचाही फारसा उपयोग झालेला नाही. व्हॅटमध्ये दोन टक्क्यांच्या कपातीनंतर जयपूरमध्ये पेट्रोलचे दर १ रुपये ३५ पैशांनी कमी झाले होते. तर डिझेलच्या दरात १ रुपये ३२ पैशांची कपात झाली होती. मात्र, त्यानंतर सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे.
देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ९१.१७ रुपये प्रती लिटर आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे ९७.४७ रुपये ९१.३५ रुपये आणि ९३.१२ रुपये प्रतिलिटर दराने विक्री सुरू आहे. डिझेलचा दर दिल्लीमध्ये ८१.४७ रुपये प्रतिलिटर आहे. मुंबईत याचा दर ८८.६० रुपये, चेन्नईत ८६.४५ रुपये आणि कोलकातामध्ये ८४.३५ रुपये प्रतिलिटर आहे. दररोज सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून दरात बदल केला जातो. पेट्रोलच्या दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर करांचा समावेश आहे. त्यामुळे मूळ किमतीच्या दुप्पट दराने विक्री सुरू आहे.