फिलिपाईन्समध्ये साखर आयातीबाबतचा वाद सुरूच

मनिला : Sugar Regulatory Administration (SRA) च्या प्रस्तावित १,५०,००० मेट्रिक टन साखर आयातीबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. SRA चे कार्यकारी प्रशासक डेविड जॉन थॅडियस अल्बा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. SRA ने १,५०,००० मेट्रिक टन आयातीची आकडेवारी कशी आणि का निश्चित केली ? अशी विचारणा करण्यात आली आहे.

National Federation of Sugarcane Planters (NFSP), Confederation of Sugarcane Producers Associations (Confed) आणि Panay Federation of Sugarcane Farmers (Panayfed) चे प्रतिनिधित्व करणाऱ्या साखर उत्पादकांनी अल्बा यांच्यासमोर आपली संयुक्त टिप्पणी सादर केली आहे. NFSP चे अध्यक्ष एनरिक रोजास, Confed चे अध्यक्ष रेमंड मोंटिनोला आणि Panayfed चे अध्यक्ष डॅनिलो एबेलिता यांनी आपापल्या संघटनेच्या वतीने या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

SRA कडून सादर केलेल्या पुरवठा आणि मागणीच्या स्थितीबाबत आपल्या विश्लेषणाच्या आधारावर, उत्पादकांनी आधीच एकूण ३,००,००० मेट्रिक टन आयातीची शिफारस केली होती. यामध्ये सुरुवातीला १,५०,००० मेट्रिक टन आयात करणे अपेक्षित होते. नंतर १,५०,००० मेट्रिक टन साखर आयात केली जाणार होती. नव्या हंगामाच्या सुरुवातीला होणारे साखरेचे उत्पादन ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतची अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे ठरणार नाही असा इशारा त्यांनी दिला. नोव्हेंबरपर्यंतची देशांतर्गत साखरेची गरज भागविण्यासाठी एक बफर स्टॉकची गरज असते असे त्यांचे म्हणणे आहे. उत्पादकांनी सध्याच्या पुरवठ्यातील तुट तत्काळ दूर करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. साखरेच्या तुटवड्यामुळे काही शीतपेय उत्पादक आणि खाद्य प्रक्रिया युनिटना आपले कामकाज बंद करणे भाग पडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here