हरियाणात शेतकरी गेल्या काही दिवसांपासून ऊस दराबाबत शेतकरी आंदोलन करीत आहेत. रविवारीही काही शेतकऱ्यांनी असंध, इंद्री आणि मेरठ रोडवरील साखर कारखान्यांसमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत ऊस दर ४०० रुपये प्रती क्विंटल केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. याप्रश्नी आज पुढील रणनीती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांनी महापंचायतीचे आयोजन केले आहे. ऊस दर वाढवला नसल्याबद्दल हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी सरकारविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्यांना ऊस पोहोचत नसल्याने रोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, जोपर्यंत सरकार त्यांना हक्काचा ऊस दर देत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही. उसाच्या पिकाला जादा उत्पादन खर्च येत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सांगितले की, उत्पादन खर्च अधिक येत आहे. पण आमच्या उसाचा योग्य भाव दिला जात नाही. अशात शेतीवर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत कुरुक्षेत्र, पानीपत, अंबाला, यमुनानगर, कॅथल जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह कर्नालमधील तीन कारखाने रविवारीही बंद राहिले. सोनीपत जिल्ह्यातील आहुलाना गावातील चौधरी देवीलाल सहकारी साखर कारखाना गेले तीन दिवस बंद आहे.