पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) द्वारे आयोजित जागतिक साखर उद्योगावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) चे कार्यकारी समिती सदस्य रवी गुप्ता म्हणाले कि, ब्राझील (मध्य दक्षिण प्रदेश) अंदाजे 660 दशलक्ष टन उसाचे गाळप करेल, जे मागील वर्षीच्या 550 दशलक्ष टनांपेक्षा 100 दशलक्ष टन वाढ अपेक्षित आहे. त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन 8.5 दशलक्ष टन अधिक राहण्याचा अंदाज आहे.
गुप्ता म्हणाले कि, ब्राझीलच्या साखर उत्पादन क्षमतेच्या सतत विस्तारामुळे साखर उत्पादनामध्ये सातत्याने वाढ होऊ शकते. त्यांनी भारताला अतिरिक्त साखर निर्मिती टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले, जे भविष्यात आव्हान निर्माण करु शकते. गुप्ता यांनी संभाव्य तोट्यात निर्यात करण्याऐवजी अतिरिक्त साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याचा सल्ला दिला.
गुप्ता यांनी देशात चालू वर्षासाठी एकूण साखर उत्पादन अंदाजे 32.7 दशलक्ष टन होण्याचा अंदाज व्यक्त केला. 28.5 दशलक्ष टनांचा देशांतर्गत वापर वगळून, 31 दशलक्ष टन निव्वळ साखर उत्पादन होईल. परिणामी 2.5 दशलक्ष टन अतिरिक्त साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. भारतासाठी अधिकतम सिरप आणि बी मोलासिसचे इथेनॉलमध्ये रुपांतर करण्याची संधी असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
गुप्ता म्हणाले कि, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये नैसर्गिक समस्या भेडसावत आहे. याठिकाणी प्रामुख्याने ऊस उत्पादन मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सून गाळप क्षमतेत चढ-उतार आणि उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मजूरीची, तोडणी व वाहतूक खर्च वाढ यामुळे साखर उद्योगासामोर आर्थिक आव्हाने उभी राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुप्ता यांनी साखरेच्या किमती गेल्या चार महिन्यांत 3650 रुपये प्रति क्विंटल वरुन 3480 रुपयांपर्यंत घसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली. गुप्ता म्हणाले कि, भारत इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाबद्दल आपण आत्मसंतुष्ट राहू नये. इथेनॉल सामिश्रण कार्यक्रमाला प्रोत्साहन देणे सुरू ठेवले पाहिजे. अतिरिक्त साखरेवर एकमात्र उपाय इथेनॉल उत्पादन आहे. सरकारने सी-मोलासीस इथेनॉलला प्रोत्साहन देऊन योग्य संकेत दिला असून चालू वर्षात उत्पादनाचे मूल्यमापन झाल्यावर अधिक साखर इथेनॉलमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.