सातारा : प्रतापगड सहकारी साखर काराखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न होते. अजिंक्यतारा – प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाने हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला सर्वांनी सहकार्य करावे आणि आगामी गळीत हंगाम यशस्वी करावा, असे प्रतिपादन अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सोनगाव येथील प्रतापगड कारखान्याच्या कार्यस्थळावर २०२४- २०२५ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीसाठी रोलर पूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने व अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समुहाच्या माध्यामातून प्रतापगड कारखाना गळीत हंगाम यशस्वी करेल. यासाठी सर्व कामे जोमाने सुरू आहेत. व्यवस्थापनानाने सुरू केलेल्या उस नोंदीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या ऊस नोंदी कराव्यात. यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्तारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदींसह संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.