मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने नाम. शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने संस्थेच्या संचालक मंडळाने ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19’ साठी ३० लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निधीत ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत राज्य सहकारी साखर कारखाना संघाने हे पाऊल उचलले आहे.
सध्याच्या काळात साखर उद्योग अनंत अडचणीतून जात असतानाही सामाजिक बांधिलकीची जाणिव राखत, तसेच देशात आणि राज्यात उद्भवलेल्या कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी सरकारला हा निधी देत असल्याचे संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.